सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२१ करोनाबाधित, ११७ मुक्त, सात जणांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१२ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या कमी झाली आहे. आज सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज ११७ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. त्यांच्यासह आतापर्यंत ४६ हजार ४१८ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात २ हजार ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज दुबार तपासणी केलेल्या दोघांसह १२१ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ७१० झाली आहे.

जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड १४, दोडामार्ग ०, कणकवली २४, कुडाळ ३२, मालवण १८, सावंतवाडी २४, वैभववाडी ३, वेंगुर्ले ४. सक्रिय रुग्णांपैकी ९० रुग्ण ऑक्सिजनवर तर २४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २८०, दोडामार्ग ५१, कणकवली ३४०, कुडाळ ५१३, मालवण २८७, सावंतवाडी २९९, वैभववाडी ७६, वेंगुर्ले १४७, जिल्ह्याबाहेरील १२.

आज जिल्ह्यात कासार्डे (ता. कणकवली), कुंभवडे (वैभववाडी) आणि शिरोडा (वेंगुर्ले) येथील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय आधीच्या ४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २८५ झाली आहे.

जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६४, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६९, कुडाळ – १९८, मालवण – २६१, सावंतवाडी – १७६, वैभववाडी – ७३, वेंगुर्ले – १००, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply