रत्नागिरी जिल्ह्यात नवबाधितांपेक्षा करोनामुक्तांमध्ये वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१२ ऑगस्ट) नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक झाली आहे.

आज १८९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर २१४ रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६९ हजार ७०९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९४.६२ झाली आहे.

आज आढळलेल्या नव्या १८९ करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या तीन हजार ८७९ नमुन्यांपैकी दोन हजार ७६५ अहवाल निगेटिव्ह, तर ११४ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ५१३ पैकी दोन हजार ४३८ अहवाल निगेटिव्ह, तर ७५ पॉझिटिव्ह आले.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७३ हजार ६७० झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ८२ हजार ७७४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज एक हजार ६६८ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ३१५, तर लक्षणे असलेले ३५३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ९०५, तर ७६३ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून १२३ रुग्णांची पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४१०, डीसीएचसीमधील १५१, तर डीसीएचमध्ये २०२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ११९ जण ऑक्सिजनवर, ६५ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या ९ आणि आजच्या ३ अशा एकूण १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील ३.१५ हा मृत्युदर घटून तो २.९५ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १७६ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ८२२ (८३.७३ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७८२ (३५.९४ टक्के) आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३३, दापोली १८७, खेड १८७, गुहागर १५५, चिपळूण ४२०, संगमेश्वर १९२, रत्नागिरी ७४१, लांजा ११८, राजापूर १४३. (एकूण २१७६).

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply