सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (११ ऑगस्ट) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार नव्या बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक आहे.
आज १२७ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले. त्यांच्यासह आतापर्यंत ४६ हजार ३०१ रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या जिल्ह्यात २ हजार १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज दुबार तपासणी केलेल्या दोघांसह ८६ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ५९१ झाली आहे.
जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ९, दोडामार्ग ३, कणकवली १२, कुडाळ १९, मालवण १३, सावंतवाडी १९, वैभववाडी १, वेंगुर्ले ८. सक्रिय रुग्णांपैकी ८९ रुग्ण ऑक्सिजनवर तर २४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड २७६, दोडामार्ग ५६, कणकवली ३३९, कुडाळ ५१०, मालवण २८६, सावंतवाडी २९५, वैभववाडी ७८, वेंगुर्ले १६६, जिल्ह्याबाहेरील १३.
आज जिल्ह्यात सावंतवाडी, वाघोटन (देवगड) आणि अणाव (ता. कुडाळ) येथील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. याशिवाय आधीच्या दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या एक हजार २७८ झाली आहे.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १६४, दोडामार्ग – ३५, कणकवली – २६८, कुडाळ – १९७, मालवण – २६१, सावंतवाडी – १७५, वैभववाडी – ७२, वेंगुर्ले – ९७, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
Follow Kokan Media on Social Media

