रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (११ ऑगस्ट) नव्या करोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली. करोनामुक्तांची संख्या कालच्या तुलनेत शंभराने घटली, तर मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवली गेली.
आज १६७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले, तर १२७ रुग्ण करोनामुक्त झाले.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ६९ हजार ४८९ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी घटून ९४.५७ झाली आहे.
आज आढळलेल्या नव्या १६७ करोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –
आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या दोन हजार ८५६ नमुन्यांपैकी दोन हजार ७६३ अहवाल निगेटिव्ह, तर ९३ पॉझिटिव्ह आले. रॅपीड अँटिजेन टेस्ट केलेल्या दोन हजार ६०२ पैकी दोन हजार ५२८ अहवाल निगेटिव्ह, तर ७४ पॉझिटिव्ह आले. दोन्ही मिळून १६७ पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ७३ हजार ४८१ झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील पाच लाख ७६ हजार ५७१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.
आज एक हजार ७११ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले एक हजार ३५०, तर लक्षणे असलेले ३६१ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ८९३, तर ८१८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात असून ११७ रुग्णांची पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ४५७, डीसीएचसीमधील १५९, तर डीसीएचमध्ये २०२ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ११७ जण ऑक्सिजनवर, ६८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.
यापूर्वीच्या ११ आणि आजच्या ३ अशा एकूण १४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील ३.१५ हा मृत्युदर घटून तो २.९४ टक्के झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या दोन हजार १६४ झाली आहे. त्यापैकी ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या मृतांची संख्या एक हजार ८१४ (८३.८३ टक्के), तर मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी सहव्याधी (कोमॉर्बिड) असलेल्या रुग्णांची संख्या ७७९ (३६.०० टक्के) आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३३, दापोली १८५, खेड १८७, गुहागर १५४, चिपळूण ४१७, संगमेश्वर १८९, रत्नागिरी ७४१, लांजा ११७, राजापूर १४१. (एकूण २१६४).
Follow Kokan Media on Social Media

