Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाचे नवे ५७ रुग्ण, ५९ करोनामुक्त, तिघांचा मृत्यू

coronavirus

Photo by CDC on Pexels.com

Advertisements

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (३० सप्टेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे नवे ५७ रुग्ण आढळले, तर ५९ रुग्ण करोनामुक्त झाले. या काळात तिघांचा मृत्यू नोंदविला गेला.

जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्याबाहेरील लॅबमध्ये तपासणी केलेल्या दोघांसह आज नवे ५७ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५१ हजार ९९१ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ५, दोडामार्ग ०, कणकवली १७, कुडाळ १२, मालवण १४, सावंतवाडी ५, वैभववाडी १, वेंगुर्ले ३. जिल्ह्यात सध्या १०५३ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ५१ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ९६, दोडामार्ग ३०, कणकवली १८९, कुडाळ २५७, मालवण १८५, सावंतवाडी १६४, वैभववाडी ३०, वेंगुर्ले ९३, जिल्ह्याबाहेरील ९.

आज फोंडा (कणकवली), आंबेरी आणि भडगाव (कुडाळ) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यात आंबेरीतील रुग्ण महिला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४०६ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७५, दोडामार्ग – ३९, कणकवली – २९२, कुडाळ – २३३, मालवण – २७९, सावंतवाडी – १९२, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version