सिंधुदुर्गात करोनाचे नवे २८० रुग्ण, २८ जण करोनामुक्त, तिघांचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१४ एप्रिल) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार करोनाची बाधा झालेले नवे विक्रमी २८० रुग्ण आढळले, तर अवघे २८ जण करोनामुक्त झाले. आज तिघांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या २८० रुग्णांमुळे करोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या आता ८ हजार ९५६ झाली आहे, तर आज २८ जण करोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची संख्या ६ हजार ९३४ झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढू लागली असून आज ती एक हजार ८१८ आहे.

आज शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील ६८ वर्षीय पुरुष, माणगाव (ता. कुडाळ) येथील ७३ वर्षीय महिला (तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता) आणि वरगाव (ता. वैभववाडी) येथील ५७ वर्षीय पुरुष (त्याला सारीचा आजार होता.) अशा तिघांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २०१ झाली आहे.

सक्रिय रुग्णांपैकी ७५ रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. यापैकी ६० रुग्ण ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटर असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply