पावस येथे १५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर

रत्नागिरी : कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील तरुण मित्र मंडळातर्फे गुरुवारी (दि. १५ एप्रिल) पावस येथील महाकाली पॅलेसमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान करण्याची गरज आहे. त्यासाठी गुरुवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. करोनाविषयक शासनाची सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांचे तंतोतंत पालन करून हे शिबिर आयोजित केले आहे गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शिबिर होईल.

रक्तदानाकरिता आवश्यक त्या सर्व प्रकारची परवानगी काढण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडूनसुद्धा आवश्यक ते सहकार्य रक्तदात्यांना मिळणार आहे. त्यामुळे आवर्जून पुढे येऊन रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन तरुण मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.

रक्तदानाविषयी अधिक माहितीसाठी अजय भिडे (99695 44724), मिलिंद बेहेरे (70669 70906), प्रसाद बेहेरे (94230 49939) किंवा हेमंत अभ्यंकर (7875946518) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply