रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांनी आज (१४ एप्रिल) सलग दुसऱ्या तीनशेची संख्या ओलांडली. आज ३२४ करोनाबाधित आढळले, तर केवळ ६६ रुग्ण करोनामुक्त झाले. आज सात जणांचा मृत्यू नोंदविला गेला.
आज सर्व तालुक्यांमध्ये बाधित रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक ८२ रुग्ण दापोली तालुक्यात होते.
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ४४, दापोली ६८, खेड ३४, गुहागर ४६, चिपळूण ५१, मंडणगड ८, राजापूर ९.(एकूण २६०). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी २१, दापोली १४, खेड १, गुहागर ५, चिपळूण ६, संगमेश्वर १२, मंडणगड २ आणि लांजा ३. (एकूण ६४) (दोन्ही मिळून ३२४). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १३ हजार ६२१ झाली आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार ६२८ आहे. त्यातील सर्वाधिक १३५ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ९०८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ६६ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ११ हजार २९९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर आज आणखी कमी झाला असून तो ८२.९५ टक्के झाला आहे.
आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ६५१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत एक लाख नऊ हजार ४२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आज सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात कालच्या सहा आणि आजच्या एका रुग्णाचा समावेश आहे. सहा जणांचा मृत्यू शासकीय रुग्णालयांत, तर एकाचा खासगी रुग्णालयात झाला. मृतांचा तपशील असा –
१३ एप्रिल – दापोली, पुरुष (वय ६५), रत्नागिरी, महिला (७५), रत्नागिरी, पुरुष (६४), लांजा, पुरुष (७८), रत्नागिरी, पुरुष (७८), संगमेश्वर, पुरुष (८६). १४ एप्रिल – चिपळूण, पुरुष (३८ वर्षे). या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ४१५ असून मृत्युदर ३.०४ टक्के आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड