सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (४ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे नवे ६५ रुग्ण आढळले, तर ४७ रुग्ण करोनामुक्त झाले. या काळात तिघांचा मृत्यू नोंदविला गेला.
जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिलेल्या अहवालानुसार, जिल्ह्याबाहेरील लॅबच्या दोन तपासण्यांसह आज नवे ६५ करोनाबाधित आढळले. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ५२ हजार २२५ झाली आहे.
जिल्ह्यातील आजच्या बाधित रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ४, दोडामार्ग ८, कणकवली ११, कुडाळ १५, मालवण ८, सावंतवाडी १८, वैभववाडी ०, वेंगुर्ले १, जिल्ह्याबाहेरील ०.
जिल्ह्यात सध्या १११५ सक्रिय रुग्ण असून, सक्रिय रुग्णांपैकी ४९ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड १०२, दोडामार्ग ३२, कणकवली १६९, कुडाळ ३०३, मालवण १९१, सावंतवाडी १५८, वैभववाडी ३१, वेंगुर्ले ११७, जिल्ह्याबाहेरील १२.
आज कलंबिस्त (सावंतवाडी) येथील ६५ वर्षीय, साटेली (सावंतवाडी) येथील ७० वर्षीय आणि सावंतवाडी येथील ७५ वर्षीय अशा तीन स्त्री रुग्णांचा मृत्यू झाला. सर्व रुग्णांना सहव्याधी होत्या. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४१६ झाली आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १७६, दोडामार्ग – ४०, कणकवली – २९४, कुडाळ – २३६, मालवण – २७९, सावंतवाडी – १९५, वैभववाडी – ८१, वेंगुर्ले – १०६, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड