coronavirus

रत्नागिरीत ३० नवे रुग्ण; ७० जण करोनामुक्त

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ४ ऑक्टोबर) जिल्हा चिकित्सकांनी दिलेल्या करोनाविषयक अहवालानुसार नवे ३० रुग्ण आढळले, तर ७० रुग्ण करोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या आता ७८ हजार २०० झाली असून, ७५ हजार १५८ जण बरे होऊन घरी गेले. करोनामुक्तीची टक्केवारी ९६.११ आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या नव्या ३० करोनाबाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या १४४६ पैकी १४२५ अहवाल निगेटिव्ह, तर २१ पॉझिटिव्ह आले. रॅपिड अँटिजेन टेस्ट केलेल्या ४७४ नमुन्यांपैकी ४६५ अहवाल निगेटिव्ह, तर ९ पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील सात लाख ६६ हजार १० जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज ६०९ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात लक्षणे नसलेले ३५५, तर लक्षणे असलेले २५४ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या ३१६ आहे. आज एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी सीसीसीमध्ये उपचार घेत असलेले ३९, डीसीएचसीमधील १०६, तर डीसीएचमध्ये १४८ रुग्ण आहेत. बाधितांपैकी ६२ जण ऑक्सिजनवर, ३३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

यापूर्वीच्या दोन आणि आजच्या तीन अशा पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ५.२७ टक्के होता. या आठवड्यात तो ३.११ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ०.४९ आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २४३३ झाली आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २१८, खेड २२२, गुहागर १६८, चिपळूण ४७५, संगमेश्वर २१३, रत्नागिरी ८११, लांजा १२६, राजापूर १६१. (एकूण २४३३).

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply