नवी मुंबई : मडगाव ते पनवेल या मार्गावर येत्या २१ नोव्हेंबरपासून विशेष साप्ताहिक गाडी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे चालविणार आहे. ख्रिसमस आणि नववर्षदिनानिमित्ताने ही विशेष गाडी धावणार आहे.
या गाडीचा 01596/01595 हा क्रमांक असून ही गाडी येत्या २१ नोव्हेंबरपासून २ जानेवारीपर्यंत दर रविवारी सायंकाळी ४ वाजता मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सव्वातीन वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेलहून ही गाडी परतीच्या प्रवासासाठी २२ नोव्हेंबरपासून दर सोमवारी सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी रवाना होईल. ती गाडी सायंकाळी पावणेसात वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी ३ जानेवारीपर्यंत धावणार आहे.
ही गाडी जाताना आणि येताना करमळी, थवी, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा येथे थांबेल. गाडीला एलएचबीचे २२ डबे असतील. गाडीला खानपान सुविधेचा डबाही असणार आहे.
या गाडीचे आरक्षण २० नोव्हेंबरपासून प्रवाशांना उपलब्ध होईल.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड