सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ नवे करोनाबाधित, ३ जण करोनामुक्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१९ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनाचे ३ नवे रुग्ण आढळले, तर ३ जण करोनामुक्त झाले. आज एका मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यात सध्या ९४ सक्रिय रुग्ण असून सक्रिय रुग्णांपैकी ६ रुग्ण ऑक्सिजनवर, तर १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सक्रिय रुग्णांची संख्या अशी – देवगड ६, दोडामार्ग ८, कणकवली २७, कुडाळ १३, मालवण ११, सावंतवाडी १५, वैभववाडी ३, वेंगुर्ले ९, जिल्ह्याबाहेरील २.

आज देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील ६६ वर्षांच्या पुरुष रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १४५७ एवढी आहे. जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १८०, दोडामार्ग – ४३, कणकवली – २९८, कुडाळ – २४३, मालवण – २८८, सावंतवाडी – २०३, वैभववाडी – ८२, वेंगुर्ले – १११, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ९.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply