रत्नागिरी : डोळ्यांच्या तिरळेपणामुळे मुले अभ्यासात मागे पडतात, त्यांना चिडवले जात असल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे न्यूनगंड तयार होतो. शिक्षण, नोकरी, करिअर, विवाह जमणे या समस्यांवर तिरळेपणावरील शस्त्रक्रिया हाच उपाय असतो. याकरिता महाराष्ट्रातील सर्वांत मोठे डोळ्यांचे हॉस्पिटल नेटवर्क असणाऱ्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने रत्नागिरीत येत्या ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत विशेष तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. बाल नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विनितकुमार महाजनी तपासणी आणि शस्त्रक्रिया करणार आहेत.
तिरळेपणामुळे अनेकांना नवनवीन संधी मिळत नाहीत. तसेच लहान मुलांच्या तिरळेपणामुळे अनेक समस्या उद्भवतात. तरुण, तरुणींचे विवाह जुळत नाहीत. डॉ. महाजनी यांनी तिरळेपणावरील हजारो शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. ते इन्फिगो आय केअरचे तज्ज्ञ डॉक्टर असून लहान मुलांचा दृष्टीदोष, तिरळे डोळे, आळशी डोळे अशा विविध आजारांची तपासणी करणार आहेत. ज्या रुग्णांची सुदृढ आरोग्य असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रियासुद्धा या कालावधीत करण्यात येणार आहे. लहान मुलांच्या पालकांची तयारी असेल तर तपासणीनंतर गरज भासल्यास मुलांवर शस्त्रक्रिया होणार आहे. परंतु त्यासाठी या तीन दिवसांत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. काही वेळा डोळ्यांसाठी विशेष व्यायायमही शिकवले जातात. शस्त्रक्रिया कोणत्याही वयाच्या मुलांवर करता येते. यामुळे मुलांचे सौंदर्य आणि नजरही सुधारते.
शांतादुर्गा संकुल, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गेल्या वर्षी १ सप्टेंबरपासून रत्नागिरीकरांच्या सेवेत रुजू झाले. आजवर येथे हजारो रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. येथे ग्रीन लेझर, ३ डायमन्शेनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड ॲनालायझर, अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणा आहे. याद्वारे रेटिनाविषयक समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तपासणी केली जाते.या हा विभाग रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील एकमेव सुसज्ज विभाग आहे.
तिरळेपणासंबंधी बालकांच्या पालकांनी या शिबिरात पूर्वनोंदणी करून उपस्थित राहावे, असे आवाहन इन्फिगो आय केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे. पूर्वनोंदणीसाठी 09372766504 या क्रमांकावर नोंदणी करावी. एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना येणे शक्य नसल्यास त्याबाबत रुग्णालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.