रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय करोनाबाधितांची संख्या ४१

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. २ डिसेंबर) सक्रिय करोनाबाधितांची संख्या ४१ आहे. आज करोनाचे २ नवे रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त होऊन घरी गेले. आज एका मृत्यूची नोंद झाली.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी करोनाविषयक अहवालात ही माहिती दिली आहे. त्यानुसार आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या २४ तासांत करोनाचे केवळ २ नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ७९ हजार १०३ झाली आहे. आज ११ रुग्ण बरे झाल्याने आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ७६ हजार ५७४ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९६.८० आहे.

जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या ३१९ पैकी ३१७, तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आणि रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या सर्व ४१२ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यातील आठ लाख ३६ हजार ३४३ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ४१ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले १८, तर लक्षणे असलेले २३ रुग्ण आहेत. गृह विलगीकरणातील रुग्णांची संख्या १८ आहे, तर संस्थात्मक विलगीकरणात २३ जण आहेत. एका रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी आहे. अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये १३, तर डीसीएचमध्ये १० रुग्ण आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. बाधितांपैकी ७ जण ऑक्सिजनवर, ३ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची एकूण संख्या २४८७ झाली आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. या आठवड्यात तो ३.१४ टक्के आहे. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर २.४४ आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२२, खेड २२८, गुहागर १७३, चिपळूण ४७८, संगमेश्वर २२३, रत्नागिरी ८२८, लांजा १३०, राजापूर १६६. (एकूण २४८७).

लसीकरणाची स्थिती

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल (दि. १ डिसेंबर) लसीकरणाची ८१ सत्रे झाली. त्यामध्ये २६५९ जणांनी पहिला, तर ६७७७ जणांनी दुसरा डोस घेतला. काल एकूण ९४३६ जणांचे लसीकरण झाले. कालपर्यंत जिल्ह्यातील एकूण १४ लाख ३५ हजार ७७५ जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ९ लाख ५७ हजार ८२३ जणांनी पहिला, तर ४ लाख ७७ हजार ९५२ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply