सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनेलने सत्ता प्रस्थापित केली आहे. या पॅनेलला ११ जागा, तर महाविकास आघाडी प्रणित सहकार समृद्धी पॅनेलला ८ जागा मिळाल्या.

बँकेतील
१९ संचालकपदासाठी निवडणूक झाली. काल ३० डिसेंबर रोजी झालेल्या या निवडणुकीत ९८.६७ टक्के मतदान झाले होते. आज सकाळपासून सिंधुदुर्गनगरीत माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या इमारतीत मतमोजणी झाली. निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख आणि विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत समसमान मते मिळाल्यानंतर चिठ्ठीवर पराभूत झाले.
त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विठ्ठल देसाई आणि सतीश सावंत यांना समसमान मिळाली. शेवटी चिठ्ठीद्वारे विठ्ठल देसाई विजयी झाले. निवडणुकीत विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवीसुद्धा पराभूत झाले.

सिद्धिविनायक सहकार पॅनेलचे प्रमुख राजन तेली यांचा निवडणुकीत पराभव झाला. राजन तेली यांना आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी पराभूत केले. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सहकारातील अनेकांना पराभवाचा धक्का बसला. जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांच्याबरोबरच एम. के. गावडे, विलास गावडे, विकास सावंत, अविनाश माणगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

निवडणुकीतील लढतींचा तपशील असा –

१. पतसंस्था
सुशांत नाईक (शिवसेना) ७८ विजयी
राजन तेली (भाजपा) ६३ पराभूत

२. पणन
सुरेश दळवी (राष्ट्रवादी) २६ पराभूत
अतुल काळसेकर (भाजपा) ४४ विजयी

३. मजूर औद्योगिक संस्था
लक्ष्मण आंगणे (शिवसेना) ८५ पराभूत
गजानन गावडे (भाजपा) ११० विजयी

४) मच्छीमार दुग्ध संस्था
मधुसूदन गावडे (राष्ट्रवादी) २७ पराभूत
महेश सारंग (भाजपा) ३३ विजयी

५) घरबांधणी देखरेख संस्था
विनोद मर्गज (राष्ट्रवादी) ५४ पराभूत
संदीप परब (भाजपा) ६८ विजयी

६) वैयक्तिक
विकास सावंत (काँग्रेस) ८५ पराभूत
समीर सावंत (भाजपा) ११० विजयी

७) महिला प्रतिनिधी
अनारोजिन लोबो ( शिवसेना) ४५७ पराभूत
नीता राणे (काँग्रेस) ५०३ विजयी
प्रज्ञा ढवण (भाजपा) ४८० विजयी
अस्मिता बांदेकर (भाजपा) ४५९ पराभूत

८) अनुसूचित जाती
आत्माराव ओटवणेकर (राष्ट्रवादी) ५०६ विजयी
सुरेश चौकेकर (भाजपा) ४५८ पराभूत

९) इतर मागास
मनीष पारकर (शिवसेना) ४८१ पराभूत
रवींद्र मडगावकर (भाजपा) ४८४ विजयी

१०) विमुक्त भटक्या जमाती
मेघनाथ धुरी (काँग्रेस) ५१७ विजयी
गुलाबराव चव्हाण (भाजपा) ४५१ पराभूत

तालुका मतदारसंघ
कणकवली
सतीश सावंत (शिवसेना) १७ पराभूत
विठ्ठल देसाई (भाजपा) १७ विजयी
चिठ्ठीने विजयी
(विद्यार्थी देवेश नरेंद्र येडके याच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली.)

देवगड
अविनाश माणगावकर (अपक्ष) १७ पराभूत
प्रकाश बोडस (भाजपा) १९ विजयी

दोडामार्ग
गणपत देसाई ( शिवसेना) ७ विजयी
प्रकाश गवस ( भाजपा) ५ पराभूत

वेंगुर्ले
मनीष दळवी ( भाजपा) १३ विजयी
विलास गावडे (काँग्रेस) ८ पराभूत

मालवण
व्हिक्टर डान्टस (राष्ट्रवादी) १९ विजयी
कमलाकांत कुबल (भाजपा) ११ पराभूत

सावंतवाडी
विद्याधर परब (शिवसेना) १७ विजयी
गुरुनाथ पेडणेकर ( भाजपा) १६ पराभूत

कुडाळ
विद्याप्रसाद बांदेकर (काँग्रेस) २० विजयी
प्रकाश मोर्ये (भाजपा) १५ पराभूत
सुभाष मडव (अपक्ष) १ पराभूत

दोडामार्ग
दिगंबर पाटील ( शिवसेना) ९ पराभूत
दिलीप रावराणे ( भाजपा) ११ विजयी

एकूण – महाविकास आघाडी – ८, भाजपा – ११

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply