मुंबई : मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस आज सात तास विलंबाने धावत आहे. दादर येथे काल (दि. १५ एप्रिल) रात्री झालेल्या एका अपघातामुळे या गाडीला उशीर झाला आहे.
दादर-पुदुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे माटुंगा रेल्वेस्थानकाजवळ घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. त्यामुळे काल रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी सुटणारी मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस (क्र. १०१११) आज पहाटे ४ वाजता सुटली आहे. पाच तास उशिरा सुटलेली ही गाडी आता सात तास विलंबाने धावत आहे. रात्री साडेबारा वाजता सुटणारी ही गाडी आज पहाटे पावणेसात वाजता सुटली आहे. ही गाडी पहाटे पावणेपाच वाजता येण्याऐवजी सकाळी साडेअकराच्या सुमारास येणार आहे. या गाडीची कोकणातील विविध स्थानकांवरील नियमित वेळ आणि आणि आजच्या दिवसाची विलंबाने येण्याची वेळ अशी – खेड पहाटे ३ ऐवजी ९.५८ वाजता, चिपळूण ३.२४ ऐवजी १०.२२ वाजता, संगमेश्वर ४ ऐवजी १०.५८ वाजता, रत्नागिरी ४.४० ऐवजी ११.३० वाजता, विलवडे ५.३४ ऐवजी दुपारी १२.३२ वाजता, राजापूर ५.५० ऐवजी दुपारी १२.४८ वाजता, वैभववाडी ६.०६ ऐवजी दुपारी १.०४ वाजता, कणकवली सकाळी ६.३४ ऐवजी दुपारी १.३२ वाजता, सिंधुदुर्गनगरी सकाळी ६.४८ ऐवजी दुपारी १.४६ वाजात, कुडाळ सकाळी ७.०२ ऐवजी दुपारी २.०० वाजता, सावंतवाडी सकाली ७.२६ ऐवजी दुपारी २.२४ वाजता. ही गाडी सकाळी १०.४५ ऐवजी सायंकाळी ५.४३ मिनिटांनी मडगावला पोहोचणार आहे.