चिपळूणच्या वाचनालयाला रामभाऊ साठे स्मृत्यर्थ २१ लाखाची देणगी

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला चिपळूण तालुक्यातील मालघर येथील नामवंत शिक्षक कै. रामभाऊ साठे यांच्या स्मृत्यर्थ साठे कुटुंबीयांनी एकवीस लाख रुपयांची देणगी दिली आहे.

वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात साठे कुटुंबीयांच्या वतीने लेखिका सौ. संध्या साठे-जोशी यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्याकडे एकवीस लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

रामभाऊ साठे हे शिक्षण क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्त्व होते. चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील रामपूर, भोम, मार्गताम्हाने, ओमळी, जामसूद, पाटपन्हाळे, हेदवी, गुणदे आदी ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू करण्यात आमदार कै. तात्यासाहेब नातू यांच्यासोबत रामभाऊंचा मोलाचा वाटा होता. अत्यंत शिस्तबद्ध आणि सुनियोजित कामकाज हे त्यांचे वैशिष्ट्य होते. रामपूर येथील मिलिंद हायस्कूलमध्ये त्यांनी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी सांभाळली होती. निवृत्तीनंतर त्यांनी मालघर येथे गुरुकुल माध्यमिक शाळा सुरू केली. वाचनाची आवड आणि इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेल्या रामभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांनी ग्रंथालयाला एकवीस लाख रुपयांची देणगी दिली.

यावेळी संस्थेचे कार्यवाह विनायक ओक, कोषाध्यक्ष, राम दांडेकर, राष्ट्रपाल सावंत, मनीषा दामले, मधुसूदन केतकर, संजय शिंदे, अविनाश पोंक्षे आदी उपस्थित होते. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला दिलेल्या देणगीबद्दल वाचनालयाच्या पुरस्कार समितीचे प्रमुख अरुण इंगवले यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply