Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचा नवा रुग्ण नाही, पाच जण करोनामुक्त

dispenser with soap and corona word

Photo by Jessica Lewis Creative on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. आज (दि. २७ जून) ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ७५० रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८२ हजार ११९ म्हणजे ९६.९० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज आरटीपीसीआरसाठी ८, तर रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी १० जणांचे नमुाने पाठविले होते. ते सर्व निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख ५१ हजार ७८४ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ९७ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ८४ रुग्ण गृहविलगीकरणात, तर लक्षणे असलेले १३ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही.

अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि ७, तर डीसीएचमध्ये ६ रुग्ण उपचार घेत आहेत. सीसीसीमध्ये एकही रुग्ण दाखल नाही. बाधितांपैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. अतिदक्षता विभागात एकही रुग्ण नाही.

जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. जिल्ह्याचा एकूण मृत्युदर २.९९ टक्के आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version