रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (दि. ४ मार्च) करोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. एक रुग्ण आज करोनामुक्त झाला. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.
जिल्ह्यात करोनाचे आतापर्यंत ८४ हजार ४४३ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ८१ हजार ९०० म्हणजे ९६.९९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आज झालेल्या तपासणीचा तपशील असा – आरटीपीसीआरसाठी पाठविलेल्या सर्व ५६, तर रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी पाठवलेल्या सर्व ४४६ रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ लाख २७ हजार २०१ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे. आज जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ९ रुग्णांपैकी लक्षणे नसलेले ८, तर लक्षणे असलेला १ रुग्ण आहे. गृह विलगीकरणात ८, तर संस्थात्मक विलगीकरणात १ जण आहे. एकाही रुग्णाची नोंद कोविड पोर्टलवर व्हायची बाकी राहिलेली नाही.
अॅक्टिव्ह रुग्णांपैकी डीसीएचसीमध्ये आणि सीसीसीमध्ये एकही रुग्ण नाही. डीसीएचमध्ये १ रुग्ण आहे. बाधितांपैकी ऑक्सिजनवर एकही रुग्ण नाही, तसेच अतिदक्षता विभागातही एकही रुग्ण नाही.
आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २,५३४ एवढीच आहे. गेल्या आठवड्यातील मृत्युदर ० टक्के होता. सक्रिय रुग्णांच्या तुलनेत आजचा मृत्युदर ० टक्के आहे. एकूण मृत्युदर ३.०० टक्के आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – मंडणगड ३९, दापोली २२३, खेड २३१, गुहागर १८२, चिपळूण ४९०, संगमेश्वर २२९, रत्नागिरी ८४१, लांजा १३२, राजापूर -१६७. (एकूण २५३४).
जिल्ह्यातील लसीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात ३ मार्च रोजी करोनाप्रतिबंधक लसीकरणाची ३४ सत्रे पार पडली. त्यात ८३ जणांनी लशीचा पहिला, तर ६८३ जणांनी दुसरा डोस घेतला. १८ वर्षांवरच्या एकूण ८४७ जणांचे लसीकरण ३ मार्च रोजी झाले. ३ मार्चपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ३१८ जणांचा पहिला, तर ८ लाख ६० हजार ६६७ जणांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण १९ लाख १२ हजार ९८५ जणांचे लसीकरण झाले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड