लोकमान्य टिळक वाचनालयात दिवाळी अंक भेट योजनेची नावनोंदणी

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात याही वर्षी वाचकांसाठी दिवाळी अंक भेट योजनेची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेची वाचनालयाच्या सभासदांसाठी वर्गणी २०० रुपये, तर बिगर सभासदांसाठी वर्गणी २०० रुपये आणि डिपॉझिट १०० रुपये असणार आहे. ही योजना २७ ऑक्टोबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत कार्यान्वित असेल. एप्रिल २०२३ मध्ये योजनेतील प्रत्येक सभासदाला सोडत पद्धतीने एक अंक भेट दिला जाणार आहे.

लोकमान्य टिळक वाचनालय १५७ वर्षे जुने असून या वाचनालयात ७५ हजाराहून अधिक ग्रंथ आहेत. कोकण हे बुद्धिवैभवाचे आगर आहे. सहा भारतरत्ने, अनेक समाजसुधारक, लेखक, इतिहास संशोधक, विचारवंत कोकणाने देशाला दिले. या सर्वांचे पुढील पिढीला परिचय व्हावेत, म्हणून वाचनालयाने कलादालन निर्माण केले आहे. यामध्ये सर्व महनीय व्यक्तींची तैलचित्रे त्यांच्या माहितीसह लावण्यात आली आहेत. वाचनालयात साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम नियमित चालू असतात. प्रतिवर्षी वाचनालयातर्फे सामाजिक, साहित्यिक पुरस्कार दिले जातात. प्राथमिक शाळांमध्ये बालसाहित्य दिले जात असते. अशा या वाचनालयात सध्या दिवाळी अंक योजनेची नावनोंदणी सुरू आहे. या योजनेचा अधिकाधिक वाचकांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी 9067375738 येथे संपर्क साधावा, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply