मडगाव-मुंबई मार्गावर रविवारी विशेष रेल्वेगाडी

नवी मुंबई : कोकण रेल्वेवर मडगाव ते मुंबई या मार्गावर येत्या रविवारी (दि. १८ डिसेंबर) एकमार्गी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. तिचे आरक्षण आज सुरू झाले आहे.

ही विशेष गाडी (क्र. 01430) मडगावहून येत्या रविवारी सकाळी साडेआठ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजता मुंबई सीएसटीएमला पोहोचेल. या गाडीचे थांबे आणि वेळ (कंसात) अशी – करमळी (सकाळी ९.१२), थिवी (९.३४), सावंतवाडी (१०.१८), कुडाळ (१०.४०), सिंधुदुर्ग (१०.५४), कणकवली (११.१०), वैभववाडी (११.४०), राजापूर (दुपारी १२.००), रत्नागिरी (दुपारी ३.००) , संगमेश्वर (३.४०), चिपळूण (४.३०), खेड (५.००), माणगाव (६.०८), रोहा (७.१०), पनवेल (रात्री ८.१०), ठाणे (९.१७) आणि दादर (१०.३०). गाडीला १७ डबे असतील. त्यापैकी १५ द्वितीय श्रेणी शयनयान असतील.

या गाडीचे आरक्षण आज सुरू झाले असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply