कणकवली : कणकवली येथील समानवता ट्रस्ट आणि संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून लहान मुलांमध्येही ते अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान आणि आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी शिबिराचे आयोजन केलेले आहे.
हर्निया, हायड्रोसील, अनडिसेंडेड टेस्टीस आणि सर्कमसिजन (सुन्ताचे ऑपरेशन) अशा ऑापरेशनला १५ हजार ते २५ हजार रुपये खर्च येतो. शस्त्रक्रिया समानवता ट्रस्ट आणि संजीवनी हॉस्पिटलमार्फत मोफत होणार आहेत. या अनुषंगाने तपासणी शिबिर येत्या सोमवारी (दि. ६ फेब्रुवारी) कणकवलीतील संजीवनी हॉस्पिटलमध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत आयोजित केले आहे. हे तपासणी शिबिर आणि होणाऱ्या शस्त्रक्रियाही पूर्णपणे मोफत आहेत. या शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांसमवेत मुंबईतील प्रसिद्ध बाल शल्यचिकित्सक डॉ. राजीव रेडकर यांच्याकडून होणार आहेत.
हे मोफत तपासणी शिबिर आणि मोफत शस्त्रक्रियांचा लाभ सिंधुदुर्गवासीयांनी घ्यावा, असे आवाहन समानवता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी आणि संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे यांनी केले आहे. या शिबिरासाठी 9421237887 या क्रमांकावर नोंदणी करावी, असे सूचित करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media



