‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, लेखक आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ मूर्तितज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत काल (दि. २ एप्रिल) झाले.

यावेळी व्यासपीठावर लेखक आशुतोष बापट, ज्येष्ठ दुर्गतज्ज्ञ प्र. के. घाणेकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, लोकमान्य टिळक स्मारकचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव उपस्थित होते.

यावेळी डॉ. देगलूरकर म्हणाले की, चिपळूणला येणे ही एक आनंदयात्रा वाटते. काही गावे अशी असतात की, तेथे सतत जावेसे वाटते. तसे चिपळूण गाव आहे. चिपळूणचे सांस्कृतिक वातावरण आकर्षक आहे. अलीकडे वाचनालयाला मिळालेली श्रीलक्ष्मीनारायणाची मूर्ती हे चिपळूणच्या वाचनालयाचे भाग्य आहे. इथल्या श्रीविंध्यवासिनी मूर्तीत कलेच्या दृष्टीने दोन महिषासुर दाखवलेले आहेत. कोकणातील मूर्ती हा एक मोठा खजिना आहे.

लेखक आशुतोष बापट म्हणाले, कोकण हा पहिल्यापासून जिव्हाळ्याचा विषय होता. मूर्तिशास्त्राचा अभ्यास झाल्यानंतर त्याला अधिक गती मिळाली. प्रकाशक म्हणून स्नेहल प्रकाशनने केलेल्या पाठपुराव्यामुळे, ज्येष्ठ मूर्तितज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ दुर्गतज्ज्ञ प्र. के. घाणेकर यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे हे लेखन शक्य झाले.

कार्यक्रमात सुवर्णपदकासह एम.टेक, पदवी संपादन केलेल्या शुभम खरे यांचा सत्कार करण्यात आला. त्याच्या अनुपस्थित तो त्याच्या वडिलांनी स्वीकारला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी केले तर धीरज वाटेकर यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply