मोदी @नाइन : रत्नागिरीत शनिवारी ज्येष्ठ नागरिक संमेलन

रत्नागिरी : मोदी @ ९ अंतर्गत रत्नागिरीत भाजपाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून शनिवारी (दि. १७ जून) सकाळी ज्येष्ठ नागरिक संमेलन होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

भाजपाच्या मोदी @ ९ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रत्नागिरीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक संमेलन, दुचाकी फेरी, बुद्धिवंत संमेलन, व्यापारी संमेलन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. विविध जबाबदाऱ्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

मोदींच्या गौरवशाली विकासपर्वाला ९ वर्षे पूर्ण होत असताना थेट नागरिकांपर्यंत मोदी शासनाचा लेखाजोखा सादर करणे, जनमानसातील प्रतिक्रिया जाणून घेणे, थेट नागरिकांशी संपर्क करत त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देणे यासाठी मोदी @ 9 हा उपक्रम भाजपाने ठरवला आहे, तो यशस्वी करण्यासाठी संघटना सक्रिय झाली आहे, असे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळातील कलम ३७० रद्द करणे, नव्या संसद भवनाची निर्मिती, भव्य राम मंदिराची निर्मिती, गोरगरिबांपर्यंत थेट पोहोचवलेल्या अनेक लाभयोजना, पायाभूत सुविधांचा वेगवान विकास, आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची उंचावलेली शान, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, डिजिटायझेशन, तसेच आत्मनिर्भर भारत, स्वच्छ भारत योजना, मोठ्या प्रमाणावर जनतेला बॅंकिंग नेटवर्कशी जोडण्याचा प्रयत्न, या योजना मोदी @ ९ मध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. जनमानसातील जागरूक प्रतिक्रिया जाणून घेण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या उपक्रमात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय सहभागी होत आहेत. यातून रत्नागिरी भाजपाची ताकद अधिक वृद्धिंगत होणार आहे, असे ॲड. पटवर्धन म्हणाले.

शनिवारी, १७ जून सकाळी ११ वाजता रत्नागिरीत भाजपच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिक संमेलन, तर सायंकाळी ५ वाजता मारुती मंदिर ते भाजपा कार्यालयापर्यंत दुचाकी फेरी काढण्यात येईल. योगदिनी २१ जून रोजी तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन, २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात बुद्धिवंत संमेलन, तर २५ जून रोजी सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालयात व्यापाऱ्यांचे संमेलन होणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply