रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासात १५ कोटी ठेव संकलनाचे उद्दिष्ट दोन दिवस शिल्लक असतानाच पूर्ण झाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
ते म्हणाले, ठेववृद्धी मास हा वार्षिक उत्सव झाला आहे. या मासात ठेवीदारांच्या मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मन चिंब झाले आहे. या प्रतिसादासमोर नतमस्तक व्हावे असे वाटते. विश्वासार्हतेची ही वार्षिक ठेव पावती म्हणजे १५ कोटींचा नवा ठेवसंचय असे वर्णन अवास्तव ठरणार नाही.
संस्थेच्या सर्व सतराही शाखांमध्ये योजनेला मोठा प्रतिसाद प्राप्त होत आहे. अजून दोन दिवस शिल्लक आहेत. या दोन दिवसांत असाच भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे. आज १ कोटी ५० लाख १२ हजारांच्या नव्या ठेवी जमा झाल्या. १११२ इतक्या ठेव खात्यात ठेव जमा केली गेली. या प्रतिसादामुळे संस्थेच्या ठेवी २७६ कोटी ९२ लाखांच्या झाल्या आहेत. पावणेतीनशे कोटींचा ठेव टप्पा ठेववृद्धी मास समाप्त होण्यापूर्वी संस्थेने गाठला आहे.
उर्वरित दोन दिवसांत ठेवीदारांनी गुंतवणुकीची संधी साधत ठेव गुंतवणूक करावी, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

