डॉ. श्रीविजय फडके, डॉ. पागरकर यांचा सत्कार

रत्नागिरी : चांगल्या कामगिरीबद्दल जिल्हा शासकीय रुग्णालयातील न्यूरोसर्जन डॉ. श्रीविजय अनिरुद्ध फडके आणि त्यांचे सहाय्यक डॉ. फरयाल पागरकर यांचा दक्षिण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे सत्कार करण्यात आला.

या दोघा डॉक्टरांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दिवसांत दोन क्लिष्ट शस्त्रक्रिया केल्या. दत्ताराम शेलार (वय ८२) यांचा पूर्ण पाय निकामी झाला होता. त्यांची शस्त्रक्रिया करून पाय पूर्ववत केला. प्रदीप जाधव (वय ४३) यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल बारा तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दोन्ही शस्त्रक्रियांनंतर रुग्णांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. डॉ. फडके आणि डॉ. पागरकर यांनी आपल्याला जीवदानच दिल्याची त्या रुग्णांची भावना आहे.

या डॉक्टरांच्या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी डॉ. फुले यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला. चांगले काम होत असताना पक्षाकडून गौरवही केला जातो, हे त्यांनी दाखवून दिले.

यावेळी सतेज नलावडे, बाबू पाटील, नंदू केदारी, दादा ढेकणे, संकेत कदम, मंदार खंडकर, पुंडलिक पावसकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, सर्वसाधारण शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना किंवा नातेवाईकांना काही अडचणी असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply