मराठा मंडळाच्या योग शिबिराला रत्नागिरीत प्रतिसाद

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठा मंडळाने रत्नागिरीत आयोजित केलेल्या योग शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरीतील मराठा मंडळातर्फे मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये पतंजली योगपीठाचे आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त ज्येष्ठ योगगुरू वीरू स्वामी यांनी प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन केले.

कंबरदुखी, गुडघेदुखी, रक्तदाब, शुगर, थायरॉइड, स्त्रियांचे आजार यासह अनेक आजारांवर उपयुक्त अशी योगाची प्रात्यक्षिके दाखवली गेली. रोगानुसार योगमार्गदर्शन, फिजिओथेरपी आणि ॲक्युप्रेशरविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत मराठा भवन सभागृहात हे शिबिर झाले. विशेष म्हणजे हे शिबिर सर्वांसाठी मोफत होते. शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply