रत्नागिरी : येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी शिबिरातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षण आणि संवर्धनात्मक दिलेल्या घोषणांनी चांदेराईचा परिसर दुमदुमून केला.
शिबिरातील स्वयंसेवकांनी चांदेराई गावात प्रभात फेरी काढली. पाणी अडवा पाणी जिरवा, धूम्रपान सोडा निरोगी आयुष्य जोडा, सर्वांनी एकच निश्चय करा पाण्याची काटकसर करा अशा विविध घोषणा स्वयंसेवकांनी दिल्या.
प्रभातफेरीनंतर सर्व स्वयंसेवक श्रमदानासाठी नदीच्या किनारी गेले. सर्वांनी एकमेकांच्या सहकार्याने नदीवर पाणी अडवण्यासाठी बंधारा घातला. मानवी साखळी करून सर्वांनी नदीकाठावरील लहान-मोठे दगड वापरून बंधारा घालण्यास सुरुवात केली. पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा देत बंधाऱ्याचे काम सुरू होते. सुमारे ९८ फूट लांबीचा हा बंधारा होता.
परतीच्या मार्गावर गावाच्या मुख्य रस्त्यावरील मंडपात सामाजिक जनजागृती म्हणून एचआयव्ही आणि एड्सविषयीचे पथनाट्य स्वयंसेवकांनी सादर केले. त्याला ग्रामस्थांनी चांगली दाद दिली.
विद्यार्थ्यांनी स्वच्छता करण्यापूर्वीचे आणि नंतरचे चांदेराईतील काजळी नदीच्या पात्राचे चित्र



