Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

स्वामी स्वरूपानंद राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेची प्राथमिक फेरी १७ डिसेंबरला

Advertisements

रत्नागिरी : पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्रीमत् संजीवनी गाथा राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून रत्नागिरी केंद्राची प्राथमिक फेरी १७ डिसेंबरला होणार आहे.

रत्नागिरी केंद्राच्या प्राथमिक फेरीचे आयोजन यावर्षी रत्नागिरीतील ‘स्वराभिषेक’ करत असून रविवारी (दि. १७ डिसेंबर) सकाळी ८ वाजता थिबा पॅलेसनजीकच्या गगनगिरी महाराज आश्रम रंगमंचावर ही फेरी पार पडेल. त्यामध्ये १५ वर्षांवरील सर्व हौशी स्पर्धक सहभाग घेऊ शकतात. स्पर्धेत स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमत् संजीवनी गाथेतील अभंगच सादर करायचे आहेत. श्रीमत् संजीवनी गाथा आयोजकांकडून उपलब्ध होऊ शकेल. याकरिता ६ मिनिटांचा अवधी असेल. स्पर्धा प्रवेश विनाशुल्क असून प्राथमिक व अंतिम फेरीकरिता आकर्षक रोख पारितोषिक तसेच सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल. प्राथमिक फेरीतून पहिल्या दोन स्पर्धकांची अंतिम फेरीकरिता निवड होईल. प्राथमिक फेरीसाठी १२ डिसेंबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची अंतिम फेरी स्वामी स्वरूपानंदांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात ४ जानेवारीला पावस येथील समाधी मंदिरात होईल.

स्पर्धेविषयी अधिक माहिती आणि नावनोंदणीकरिता स्वराभिषेकचे आनंद पंडित (9422432617) किंवा अमित भागवत (9422656724) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version