नेहरू युवा केंद्र, ग्रामजीवन आधार संस्थेतर्फे युवक दिन

लांजा : सापूचे तळे (ता. लांजा) येथील कै. रा. सी. बेर्डे कनिष्ठ महाविद्यालयात आज झालेल्या राष्ट्रीय युवा दिनी भाजप नेते बाळासाहेब माने यांनी तेथील युवकांशी संवाद साधला.

भारत सरकारच्या युवा कार्य तथा क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्राच्या विद्यमाने व ग्रामजीवन आधार समाजसेवी संस्था (रत्नागिरी) यांच्या सहकार्याने राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. भाजपा नेते, माजी आमदार, रत्नागिरी विधानसभा निवडणूक प्रमुख बाळासाहेब माने यांनी स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनाच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्री. माने म्हणाले, स्वामी विवेकानंदांच्या भारताची संकल्पना जगभर मान्य आहे. आज पंतप्रधान पदावर विराजमान झालेले नरेंद्र मोदी आपल्या पुरुषार्थाने या संकल्पनेला सिद्धीस नेत आहेत. आज युवकांनी आपली कर्तबगारी दाखवण्यासाठी सज्ज व्हावे. विविध दाखल्यांसहित त्यांनी युवकांना संदेश दिला. रोजगार, पायाभूत सुविधा याव्यतिरिक्त पर्यटन अशा विविध विषयांवर आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन करून त्यांनी आगामी काळात रत्नागिरीच्या उज्ज्वल भवितव्याविषयी आशावादी भाष्य केले.

यावेळी युवा संविधान संवादक अमर पवार, ग्रामजीवन आधार समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक कांबळे, युवा नेते मिहिर माने, भाजपा रत्नागिरी तालुकाध्यक्ष संयोग (दादा) दळी, सरपंच अनंत घवाळी, उपसरपंच निलेश पाष्टे, विश्वनाथ गुरव, रूपेश पत्याने, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा समन्वयक संजय लोटणकर, लांज्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी संजय म्हेत्रे, अनिल गुरव, ग्रामसेवक विक्रांत साळवी आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply