Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

अरुअप्पा जोशी अकादमीतर्फे सेट/नेट मार्गदर्शन

Advertisements

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस नेट सेट परीक्षांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

रविवार दि. ४, ११ आणि १८ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत नेट / सेट मार्गदर्शन करण्याचे अकादमीचे हे चौथे वर्ष आहे. मागील ३ वर्षांत अकादमीमधून मार्गदर्शन घेऊन अकादमीचे ४ प्रशिक्षणार्थी सेट परीक्षा तर २ प्रशिक्षणार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

अकादमीमार्फत नेहमीच निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. अकादमीतर्फे दरवर्षी एमपीएससी इंटीग्रेटेड कोर्स, फाउंडेशन कोर्स, बँकिंग – रेल्वे – इन्शुरन्स बॅच, तलाठी भरती, पोलीस भरती हे निरनिराळे कोर्सेस घेतले जातात. बरेच विद्यार्थी येथून प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या स्तरांवर नोकरी करत आहेत. अकादमीतर्फे गेली अनेक वर्षे अल्प शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

नेट-सेटची कार्यशाळा तिन्ही दिवस फेब्रुवारीमधील रविवारी आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेसाठी तीन दिवसांचे मिळून ५०० रुपये शुल्क आकारले जाणार असून याचा फायदा प्राध्यापक तसेच पदव्युत्तर पदवी करत असणाऱ्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ८८०५५०६८८३/ ९४०३५०७४८० पत्ता – तळमजला, जेएसडब्ल्यू बिल्डिंग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, खातू नाट्य मंदिरामागे, रत्नागिरी – ४१५ ६१२.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version