क्रिकेटपटू रिंकू सिंगचे बंधू विशाल सिंग भारत भ्रमणानिमित्ताने देवरूखला दाखल

देवरूख : अलीगड (उत्तर प्रदेश) ते कन्याकुमारी भारत भ्रमणाला निघालेले विशाल निरंकारी यांचे देवरूख येथे स्वागत करण्यात आले. भारतीय क्रिकेट संघातील रिंकू सिंग यांचे विशाल हे लहान भाऊ आहेत.

भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत विविध संदेश समाजाला देत विशाल निरंकारी अलीगड ते कन्याकुमारी असा भारतभ्रमण दौरा करत आहेत. या दौर्‍यात ते देवरूखला आले असता देवरूखवासीयांशी त्यांनी संवाद साधला. खिशात एकही रुपया न घेता भारत भ्रमणासाठी ते बाहेर पडले आहेत. समाजात चांगली माणसे आहेत, परोपकारी आहेत. ते मला मदत करत आहेत. त्या त्या गावात जाण्यासाठी मी वाहनचालकांकडे लिफ्ट मागतो, मंदिरात राहतो. असा प्रवास महिनाभर करत कोल्हापुरातून देवरूखला पोहोचलो, असे विशाल यांनी सांगितले. रत्नागिरीला आणि त्यानंतर पुढे गोव्याला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

झाडे लावा, झाडे जगवा, नदी स्वच्छ ठेवा, प्लास्टिक वापरू नका, आपला निसर्ग आपण जपा असा संदेश देणारी ही भारत भ्रमण यात्रा आहे. भाषा, प्रांत वेगळा असला तरी भारतातील माणसे सकारात्मक विचार करणारी आहेत. भारतीय संस्कृती महान आहे, असे विशाल यांनी सांगितले. साडेतीन हजार किलोमीटर प्रवास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीड हजार झाडे लावून एक प्लांट बनवला असून ती सर्व झाडे दत्तक घेऊन त्याचे संवर्धन करणार असल्याचे सांगत देवरूख परिसरात आल्यावर आपले देवरूख-स्वच्छ सुंदर देवरूखचे फलक पाहून समाधान वाटले, असे विशाल निरंकारी यांनी सांगितले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा. टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply