Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी, डेरवणमध्ये २० दिवसांचे मोफत क्रीडा प्रशिक्षण

Advertisements

रत्नागिरी : येत्या १ मे ते २० मे या कालावधीत रत्नागिरीत खो-खो आणि व्हॉलीबॉलचे, तर डेरवण (ता. चिपळूण) येथे जिम्नॅस्टिक खेळाचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना वेळ घालविण्याकरिता राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध ठिकाणी विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळाचे मूलभूत कौशल्ये त्यांनी आत्मसात करावीत, तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटांना जिद्दीने लढा देता यावा, या उद्देशाने जिल्ह्यातील विविध शाळा, संघटना व संस्थेच्या माध्यमातून विविध खेळांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

रत्नागिरीच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर १ मे ते २० मे कालावधीत सायंकाळी ५ ते ७ या वेळेत खो-खो आणि व्हॉलीबॉलचे, तर डेरवण येथील एस.व्ही.जी.टी. क्रीडा संकुलात जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण शिबिर याच कालावधीत सकाळी ७ ते ९ वाजता आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० वा. या वेळेत घेण्यात येणार आहे. या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

हे प्रशिक्षण अनिवासी तसेच निःशुल्क आहे. खो खो खेळासाठी ऐश्वर्या सावंत (८९७५०६९६२३), व्हॉलीबॉलसाठी गणेश खैरमोडे (९२८४३४२२१०) आणि जिम्नॅस्टिकसाठी सचिन मांडवकर (८४०८८६५८७०) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version