सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर

मुंबई : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवडी येथील सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मोफत लाठी-काठी प्रशिक्षण शिबिर पार पडले.

कार्यक्रमात ५० महिला आणि लहान बालिकांना लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा सराव कायम ठेवण्यासाठी आवाहन केले. सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्य आणि नुकत्याच राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केलेल्या राष्ट्रीय लाठी खेळाडू लीना हिर्लेकर यांनी मार्गदर्शन केले.
संकटाशी दोन हात करताना स्त्रियांना धैर्याने लढता यावे आणि आत्मसंरक्षण करता यावे, हा प्रामाणिक हेतू डोळ्यांसमोर ठेवून प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर, पॉवरलिफ्टिंग आणि बेंचप्रेस या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरीबाबत दोन वेळा महाराष्ट्र शासनाने शिव छत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केलेल्या सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रक्षा रामकृष्ण महाराव यांचेही मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे यांचे मार्गदर्शन लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना अर्पण केलेली कवड्यांची माळ त्यांनी सोबत आणली होती. तिचे दर्शन सर्वांना घेता आले.

यावेळी बृहन्मुंबई महापालिका स्थापत्य समिती अध्यक्ष (शहर) दत्ताराम पोंगडे, स्थानिक शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ, भारतीय पॉवर लिफ्टर किरण सणस, पत्रलेखक राजन देसाई यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य पोलीस अधिकारी शाहीर प्रवीण फणसे व बालशाहीर शर्वरी फणसे यांच्या पहाडी आवाजात महिला दिनविशेष पोवाडा गाऊन करण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई व जवळपासच्या जिल्ह्यातून आलेल्या शेकडो दुर्गसेवक, दुर्गसेविकांची उपस्थिती, नियोजन, शिस्त उल्लेखनीय होती.
(गुरुदत्त वाकदेकर)

लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सोबतच्या व्हिडीओमध्ये

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply