सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या पत्रलेखन स्पर्धेचा निकाल

विविध गटांमध्ये प्रफुल्ल साने, किरण सावंत, वैदेही सावंत, हर्षिता गावडे प्रथम

प्रफुल्ल अनंत साने

सावंतवाडी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदान अवयवदान पत्रलेखन स्पर्धेत प्रफुल्ल अनंत साने, किरण मोतीराम सावंत, वैदेही अनिल सावंत आणि हर्षिता नयनेश गावडे यांनी विविध गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी ही माहिती दिली.

रक्तदान, अवयवदान, देहदान आणि रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था असा सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा लौकिक आहे. संस्थेमार्फत रक्तदान अवयवदान जागृती करण्याकरिता पत्रलेखनाचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला होता. पत्रलेखन ही विस्मृतीत गेलेली गोष्ट यानिमित्ताने पुन्हा एकदा पुनरुज्जीवित झाली. विद्यार्थी आणि खुल्या गटात मिळून ३६४ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्या सर्वांनी अंतर्देशीय पत्रे लिहून स्पर्धा यशस्वी केली. सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्रातही अशी स्पर्धा घेणारी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही पहिलीच संस्था आहे.

किरण मोतीराम सावंत

स्पर्धेत शालेय गटात २७३ विद्यार्थ्यांनी, तर खुल्या गटातून ९१ स्पर्धकांनी सहभाग घेतला, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी येथील स्पर्धकही सहभागी झाले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा :
सर्व गटांतून सर्वोत्कृष्ट – प्रफुल्ल अनंत साने (डोंबिवली)

खुला गट : (प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ या क्रमाने) – किरण मोतीराम सावंत (भिरवंडे-कणकवली), श्रीमती सुकांती सखाराम पालकर (वैभववाडी), श्रीमती गीता गजानन लळित (देवगड), श्रीमती शीतल गोविंद गवस (तळकट), श्रीमती श्रुती केशव गोगटे (मालवण), श्रीमती स्वाती संजय खैरकर (रामटेक, नागपूर).

वैदेही अनिल सावंत

शालेय गट (पाचवी ते सातवी) : (प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ या क्रमाने) – हर्षिता नयनेश गावडे-सहावी (आरवली), विधी वीरेंद्र चिंदरकर-सातवी (कणकवली), वैष्णवी गणेश हावळ-पाचवी(माडखोल सावंतवाडी), उत्तेजनार्थ – अक्षरा गोविंद नाईक-सातवी (केरवडे, कुडाळ), केतकी प्रकाश आंबेरकर-सहावी (जामसंडे, देवगड), मानसराज महेश गवस-सातवी (वाफोली, सावंतवाडी).

शालेय गट (आठवी ते दहावी) : (प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ या क्रमाने) – वैदेही अनिल सावंत (नाटळ, कणकवली) नेहा सुधीर पाटील (जामसंडे, देवगड) नेहल विजय परब (खानोली, वेंगुर्ले), श्रद्धा शामसुंदर पोईपकर-दहावी (पोईप, मालवण), सुदीप्ता चंद्रशेखर तेली-दहावी (जामसंडे, देवगड), श्रुतिका देवदत्त जुवलेकर-आठवी (उभादांडा, वेंगुर्ले).
स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैभव आईर, अॅड.संदीप चांदेकर, साहित्यिक चंद्रकांत सावंत, प्रकाश तेंडोलकर यांनी केले.

सर्व गटांमधील पहिल्या तीन विजेत्यांना बक्षिसाच्या रकमेसह स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, तर सर्व उत्तेजनार्थ विजेत्यांना बक्षिसाच्या रकमेसह प्रमाणपत्र दिले जाईल. बक्षिसांची रक्कम अशी :

सर्वोत्कृष्ट (सर्व गटांतून) – १७५१/- रु.

खुला गट – प्रथम – १५०१/- रु., द्वितीय – १२५१/- रु., तृतीय – ११११/- रु. उत्तेजनार्थ (प्रत्येकी) ७५१/- रु.

शालेय गट (पाचवी ते सातवी) – प्रथम ५०१/- रु., द्वितीय – ३०१/- रु., तृतीय – २०१/- रु., उत्तेजनार्थ (प्रत्येकी) – १०१/- रु.

शालेय गट (आठवी ते दहावी) – ५०१/- रु., द्वितीय – ३०१/- रु., तृतीय – २०१/- रु., उत्तेजनार्थ (प्रत्येकी) – १०१/- रु.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply