चिपळूणमध्ये रविवारी दोन तासांचा ‘वाचू आनंदाने’ उपक्रम

चिपळूण : चिपळूण येथे रविवारी (दि. १३ जुलै) सकाळी ८ ते १० या वेळेत ‘वाचू आनंदाने’ उपक्रमांतर्गत दोन तास मराठी भाषेतील पुस्तकांचे वाचन केले जाणार आहे.

चिपळूण नगरपालिका आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ‘वाचू आनंदाने’ या नावाने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत येत्या रविवारी सकाळी ८ वाजता या उपक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक वाचनालयात होणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांसाठी खुला असलेला हा कार्यक्रम वाचन संस्कृतीला नवे बळ देणारा ठरणार आहे.

या उपक्रमास चिपळूण पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे सक्रिय मार्गदर्शन लाभले असून उद्यान विभाग प्रमुख प्रसाद (बापू) साडविलकर व प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर हे विशेष समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वतःचे आवडते मराठी पुस्तक घेऊन यावे, तसेच मोबाइल घरी ठेवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘वाचन हीच खरी सख्याची वाट’ हे ब्रीद अंगीकारत चिपळूणमध्ये वाचनाची चळवळ रुजावी, हा या अभिनव उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी वाचकांना पुस्तक उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply