रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातल्या आरे-वारे इथल्या समुद्रकिनारी गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज (१९ जुलै) संध्याकाळी उशिरा घडली. त्यात तीन तरुणी आणि एका पुरुषाचा समावेश असून, दोघी जणी ठाणे-मुंब्रा इथल्या आहेत. उजमा शमशुद्दीन शेख आणि उमेरा शमशुद्दीन शेख या दोघी मुंब्र्यातून रत्नागिरी शहरातल्या ओसवालनगर इथे आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. आज सायंकाळी त्या दोघी जुनेद काझी आणि जैनब काझी यांच्याबरोबर आरे समुद्रकिनारी फिरायला गेल्या होत्या. आनंद घेण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरल्यानंतर लाटांचा आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे काही मिनिटांतच चौघेही जण बुडाले. स्थानिकांनी आणि किनाऱ्यावरच्या रक्षकांनी त्यांना वाचवण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. चौघांनाही स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं; मात्र त्यांचा मृत्यू झाला. हे चौघंही १९ ते ३६ या वयोगटातील आहेत. दरम्यान, अशा दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांनी खवळलेल्या समुद्रात उतरू नये, असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केलं आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







