चिपळूणच्या दोघी सायकलपटूंची स्टॅच्यू ऑफ युनिटीला गवसणी

चिपळूण : चिपळूण सायकलिंग क्लबच्या डॉ. अश्विनी गणपत्ये आणि सौ. धनश्री गोखले या दोघींनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला गवसणी घातली. संपूर्ण कोकणातून सायकलने अशी सायकल सफर करणाऱ्या त्या पहिल्याच महिला सायकलपटू आहेत.

चिपळूण ते केवाडिया हा चारशे किलोमीटरचा टप्पा त्या दोघींनी तीन दिवसांत पार केला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बाजूने वेगाने जाणाऱ्या गाड्या, बोचरी थंडी, आडवातिडवा येणारा वारा, सतत वर्दळीचा रस्ता असूनही एकटेपणाची जाणीव करून देणारी ही मोहीम त्या दोघींनीच सहजपणे पार केली. रोज सुमारे दीडशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला. वल्लभभाई पटेल स्मारकाचा परिसर त्यांनी गाठला तेव्हा उद्दिष्ट गाठल्याचे समाधान त्या दोघींना झाले.

सफर पूर्ण झाल्यानंतर त्या पुन्हा सायकलनेच चिपळूणला परतल्या तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सायकलिंग क्लबने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. डॉ. अश्विनी गणपत्ये, सौ. धनश्री गोखले या दोघी सायकलपटूंचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत चिपळूण सायकलिंग क्लबचे अध्यक्ष मनोज भाटवडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply