संगीत अयोध्येचा ध्वजदंड – राज्य संगीत नाट्य स्पर्धा

अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र

३१ जानेवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता

रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ३१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक गोव्यातील सान्वी कला मंचाने सादर केले.

सादर करणारी संस्था :

सान्वी कला मंच, मांद्रे, गोवा

नाटक – संगीत अयोध्येचा ध्वजदंड

लक्ष्मण आणि ऊर्मिला यांच्या जीवनावर हे नाटक बेतलेले आहे. रावणाचा वध करून राम सीतेची मुक्तता करतो. पण जेव्हा श्रीराम सीतेला स्वीकारत नाही, तेव्हा स्वतः अग्निदेव रामाला सीतेच्या पावित्र्याची साक्ष देतो. रामाचा राज्याभिषेक होतो. काही काळ लोटतो. राम-सीता, लक्ष्मण-ऊर्मिला यांचा सुखाचा संसार सुरू होतो.

एक दिवस राम आणि सीतेची निंदा लोकांकडून निंदा होत असल्याचे रामाच्या दूताकडून समजते. रावणाच्या घरी राहिलेल्या सीतेचा स्वीकार रामाने केल्याने अयोध्येच्या प्रजेने निंदा आरंभिलेली असते. राजाचे कर्तव्य म्हणून लक्ष्मणाकरवी श्रीराम सीतेला वनात सोडतो. हे समजताच उर्मिला लक्ष्मणावर नाराज होते. वाल्मीकी मुनी सीतेला घेऊन आश्रमात जातात.

त्यानंतर एके दिवशी कालपुरुष रामाच्या भेटीला येतात आणि रामाला त्याचे अवतारकार्य संपलेले आहे, असा संकेत देतात. पण त्यासाठी त्यांची चर्चा सुरू असताना कोणी त्यांच्या एकांताचा भंग केल्यास त्याला देहान्त शासन देण्याचे वचन ते रामाकडून घेतात. त्याच वेळी दुर्वास ऋषी रामाला भेटण्यासाठी येतात. लक्ष्मण रामाला तसा निरोप देतो. पण कालपुरुष आणि रामाच्या एकांताचा भंग होतो. त्यामुळे रामाने दिलेल्या वचनानुसार आता लक्ष्मणाला देहान्त शासन द्यावे लागणार होते. त्यामुळे रामाला फार दुःख होते. लक्ष्मणाला देहान्त शासन द्यायला राम असमर्थ होतो. लक्ष्मणाचा त्याग हीच त्याची शिक्षा, असे तो घोषित करतो. पण लक्ष्मणाला हे मान्य होत नाही. तो ऊर्मिलेसह शरयु नदीला देह समर्पित करतो, असे या नाटकाचे कथानक आहे.

श्रेयनामावली
लेखक : महादेव हरमलकर
दिग्दर्शक : नीलेश नाईक
संगीत दिग्दर्शन आणि ऑर्गन : शिवानंद दाभोलकर
नेपथ्य : मनस्वी हरमलकर
पार्श्वसंगीत : नीलेश नाईक
तबला : दत्तराज च्यारी
प्रकाशयोजना : पांडुरंग पांगम
रंगमंच आणि वेशभूषा : लवू नाईक, संतोष चौगुले
रंगभूषा : साजरो शेटगावकर

अयोध्येचा ध्वजदंड नाटकातील काही दृश्ये

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply