रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नऊ महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याला दिलेली भेट अखेरची ठरली. अजितदादांचे आज, बुधवारी (२८ जानेवारी) सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. तत्पूर्वी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा केलेला दौरा अखेरचा ठरला. अजितदादांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या केलेल्या दौऱ्याच्या काही आठवणी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी छायाचित्रांच्या रूपाने जागविल्या आहेत.
अजितदादा पवार यांनी गेल्या वर्षी १७ मार्च आणि २७ एप्रिल २०२५ असे दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला विविध विकासकामांसाठी भेट दिली होती. त्याच्या आठवणी सांगणारी छायाचित्रे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी प्रसृत केली आहेत. रत्नागिरीत १७ मार्च २०२५ टाटा टेक्नॉलॉजी संचालित कौशल्यवर्धन केंद्र प्रकल्पाचे भूमिपूजन, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणातील विविध विकासकामांची पाहणी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टीच्या पहिल्या भागाचे उद्घाटन, थिबा पॅलेस येथील थ्रीडी मॅपिंग मल्टीमीडिया शो (खुले) नाट्यगृह प्रकल्पाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर अजितदादांनी २७ एप्रिल २०२५ रोजी कसबा-संगमेश्वर भागाचाही दौरा केला होता. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आणि कसबा परिसराच्या विकासाशी संबंधित आढावा बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली होती. ती त्यांची रत्नागिरी जिल्ह्याला दिलेली शेवटची भेट ठरली.
रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाच्या संग्रहातील छायाचित्रे सोबत दिली आहेत. तसेच कोकण मीडियाच्या संग्रहातील त्यांच्या भाषणांचे व्हिडिओही शेवटी दिले आहेत.















कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

