Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

त्रिंबक वाचनालयातर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

Advertisements

मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने दादा ठाकूर (आचरे- पारवाडी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुल्या (प्रौढ गट) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९-३० वाजता त्रिंबक येथील जनता विद्या मंदिरच्या सभागृहात घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचे विषय असे – १) व्यक्तिमत्व विकासात ग्रंथालयांचे स्थान, २) मोबाइल! आदर्श समाजजीवनाचे वरदान की शाप?, ३) ग्रामीण भागातील
युवांच्या विवाहसमस्या आणि उपाययोजना. यापैकी कोणताही एक विषय स्पर्धकाने निवडावयाचा आहे. सादरीकरण करण्याची वेळ ६ ते ८ मिनिटे राहील. १ जानेवारी २०२६ पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणताही स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.

विजेत्यांना अनुक्रमे २०००/-, १५००/- आणि १०००/- तर उत्तेजनार्थ विजेत्याल ५००/- रुपयांचे रुपयांची रोख पारितोषिक तसेच सर्वांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाईल. प्रथम प्रवेशपत्रिका आलेल्या १५ स्पर्धकांनाच स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

स्पर्धकांनी आपली नावे सहाय्यक ग्रंथपाल विवेक जाधव (९४२०७६३०१९, व्हॉटसअॅप -९०४९१२०६१०) यांच्याकडे १४ मार्च २०२६ पर्यंत द्यावीत. स्पर्धकांची संख्या १५ स्पर्धक झाल्यानंतर नोंदणी बंद केली जाईल. अधिक माहितीसाठी अध्यक्ष सुरेंद्र सिताराम सकपाळ (९४२३३०१५८४) यांच्याशी संपर्क साधावा. प्रवेश अर्ज व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात येईल तो भरून वेळेत पाठवावा. अशी सूचना संस्थेचे सेक्रेटरी प्रशांत मेहेंदळे यांनी केली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version