गाडगीळ गुरुजी वाचनालयाच्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने आयोजित केलेल्या दादा ठाकूर स्मृती जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

स्पर्धेत संजीव राऊत (देवगड) यांनी प्रथम, तर श्रीमती सायली म्हाडगूत (मसुरे, मालवण) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

त्रिंबक येथील वाचन कला विकास समिती संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने ही जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा त्रिंबक येथील जनता विद्या मंदिरात आयोजित केली होती. स्पर्धेतील उर्वरित निकाल असा – तृतीय – श्रीमती श्रद्धा सत्यवान मडव (जांभवडे, कुडाळ), उत्तेजनार्थ – संग्राम सतीश कासले (मालवण), चंद्रशेखर चिंतामण हडप (काळसे, मालवण). स्पर्धेचे परीक्षण एकनाथ गायकवाड आणि अनघा कदम यांनी काम केले.

स्पर्धेचे उद्घाटन वाचनालय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र सीताराम सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोमसाप मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. स्पर्धेचे उद्घाटन आचरा येथील रामेश्वर वाचन मंदिराच्या ग्रंथपाल श्रीमती विनीता कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. सुरेश ठाकूर यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल समितीचे कौतुक केले. सुरेंद्र सकपाळ यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

स्पर्धेत एकूण १२ स्पर्धकांनी भाग घेतला. अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज, ‘सुशिक्षित होऊ या की सुसंस्कृत, चांद्रयान मोहीम आणि भारत व छत्रपती शिवराय – जाणता राजा असे चार स्पर्धेसाठी देण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी संयोजन समितीकडून चोखंदळ श्रोता स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विनीता कांबळी आणि कदम सर यांनी पुरस्कार पटकावले. यावेळी ग्रंथपाल अमेय लेले, उपग्रंथपाल विवेक जाधव, लिपिक श्रीमती गोसावी, चैताली सुतार हे ग्रंथालयीन कर्मचारी तसेच त्रिंबकच्या माध्यमिक शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सुधीर मेहेंदळे, त्रिंबकच्या जनता विद्या मंदिरचे प्राचार्य प्रवीण घाडी, कार्यवाह प्रशांत मेहेंदळे, श्रीमतीकासले, कदम सर, क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग आदी सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक प्रवीण घाडी यांनी केले तर आभार अमेय लेले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र वारंग यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply