त्रिंबक वाचनालयातर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

मालवण : त्रिंबक (ता. मालवण) येथील कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

वाचन कला विकास समिती, त्रिंबक संचालित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाने दादा ठाकूर (पारवाडी, आचरे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा २१ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्रिंबकच्या जनता विद्यामंदिरात होणार आहेत.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेल्या १ जानेवारीपूर्वी स्पर्धकाने वयाची १७ वर्षे पूर्ण केलेली असावीत. सतरा वर्षावरील जिल्ह्यातील कोणीही स्पर्धक स्पर्धेत सहभाग घेऊ शकेल. कमाल वयोमर्यादेचे बंधन नाही. स्पर्धेकरिता १) अंधश्रद्धा निर्मूलन – काळाची गरज, २) सुशिक्षित होऊ या की सुसंस्कृत?, ३) चांद्रयान मोहीम आणि भारत, ४) छत्रपती शिवराय जाणता राजा हे चार विषय देण्यात आले असून त्यापैकी कोणताही एक विषय स्पर्धकाने निवडावा. सादरीकरणाची वेळ किमान ६ मिनिटे आणि कमाल ८ मिनिटे असून त्यांचे मूल्यमापन ५० गुणांचे असेल.

विजेत्या स्पर्धकांना बक्षिसादाखल संस्थेमार्फत अनुक्रमे २००० रुपये, १५०० रुपये, १००० रुपये आणि स्मृतिचिन्ह देण्यात येईल. स्पर्धकांची संख्या १० पेक्षा अधिक झाली, तर उत्तेजनार्थ ५०० रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत.

प्रवास खर्च प्रत्येक स्पर्धकाने स्वतःच करावयाचा आहे. पहिल्या १५ स्पर्धकांना प्रवेश देण्यात येईल. प्रवेश अर्ज आणि प्रतिस्पर्धक ५० रुपयांचे प्रवेश शुल्क २५ मार्च २०२४ पर्यंत पाठवावे. सादरीकरणानंतर स्पर्धकांना प्रवेश शुल्क परत करण्यात येईल.

स्पर्धेबाबत सविस्तर माहितीसाठी सुरेंद्र सी. सकपाळ (अध्यक्ष – ९४२३३०१५८४, ९४२१६४६१५३), अमेय अ. लेले (ग्रंथपाल – ९४२०६८४६१२) किंवा विवेक म. जाधव (९४२०७६३०१९) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धकांनी आपले संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक टाइप करून पाठवावा. संपर्क झाल्यानंतर प्रवेश अर्ज व्हॉट्स अॅप क्रमांकावर पीडीएफ स्वरूपात पाठविण्यात येईल, असे अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ यांनी कळविले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply