रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विसावे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : नाणीज (ता. रत्नागिरी) येथील श्रीमती मंजुळा तोडणकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदान केले. हे महाविद्यालयातील विसावे देहदान होते.

जगद्गुरू नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून त्यांच्या शिष्यपरिवारातील मंजुळा वसंत तोडणकर (वय ९१, रा. तळवाडी, नाणीज, रत्नागिरी) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल, दि. २१ मे रोजी करण्यात आले. हे महाविद्यालयातील विसावे देहदान होते.

कै. मंजुळा तोडणकर यांच्या पश्चात मुलगा वसंत तोडणकर आणि सून असा परिवार आहे. देहदान वेळी मुलगा श्री. वसंत, सून व नातेवाईक उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयात रामानंद संप्रदायाचे पदाधिकारी संदीप नार्वेकर, मुन्ना साळवी, अनिता जाधव, राजन बोडेकर आदी उपस्थित होते. नरेंद्र महाराज संस्थानातर्फे हे पाचवे देहदान करण्यात आले. सागर भिंगारे, माणिक पाटील, नाणीजचे सरपंच विनायक शिवगण यांचे सहकार्य मिळाले.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागातील डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडिवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी, श्रीपाद गांधी व रुग्णवाहिका चालक पवन झोरे यांचे सहकार्य लाभले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply