आकाशवाणीचा संकोच

आकाशवाणी हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे स्थानिक खासदार विनायक राऊत आणि राज्यसभेचे सदस्य असले तरी कोकणाचे प्रतिनिधित्व करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विकेंद्रीकरणाकरिता लक्ष घालणे अपेक्षित आहे. वेळीच धोरणात्मक सुधारणा झाली नाही तर रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्राला वर्धापन दिनाऐवजी स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ येऊ शकेल.

मोबाइल व्यसनमुक्तीची गरज

मुलांचा जास्त वेळ मोबाइलवर जात असल्यामुळे डोळ्यांच्या आणि इतर शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत, तो भाग वेगळा. पण अभ्यासाच्या नावाखाली अभ्यासाचा मोजका वेळ वगळता मुले आभासी जगात जास्त रममाण होत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षातील जगण्याकडे त्यांनी पाठ फिरविली आहे. क्रीडांगणाकडे तर मुलांनी साफ दुर्लक्ष केले आहे, पण क्रीडांगणाची गरज नसलेल्या इतर शारीरिक कसरतीही मुले टाळू लागली आहेत.

न-कर्त्याचा नव्हे, कर्त्याचा वार शनिवार!

मराठीत अनेक म्हणी आणि वाक्प्रचार आहेत. त्यापैकी न कर्त्याचा वार शनिवार हा एक आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात शनिवारी करू नये. त्यादिवशी सुरू केलेली कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत, कार्याला गती प्राप्त होत नाही. कधी कधी तर कामे एवढी रखडतात की ती अर्ध्यातून सोडून द्यावी लागण्याची परिस्थिती ओढवते, असा समज आहे. याला समाजाला संपूर्ण छेद देत नकर्त्याचा नव्हे, तर कर्त्याचा वार शनिवार असा नवा वाक्प्रचार अस्तित्वात आला आहे.

बंडखोर की तारणहार?

शिवसेनेतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपली घुसमट व्यक्त केली. पण मुख्यमंत्री असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी पक्षानिष्ठेपेक्षाही पदच प्रतिष्ठेचे केले. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या तत्त्वांशीच अडीच वर्षांपूर्वी बंडखोरी केली. त्याची निस्तरणीच शिंदे आता करत आहेत.

कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहोचवू या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश आपल्या कामातून देऊ या,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (३० जून २०२२) केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी बैठकीस उपस्थित होते.

हाती केवळ एक शून्य!

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कवी विंदा करंदीकर यांची ‘तेच ते आणि तेच ते’ ही कविता नेहमीच आठवते. रोज नवे काही घडत असल्याचे भासत असले तरी त्यात फारसे काही वेगळे नसते. राजकारण्यांच्या खेळामध्ये पाच वर्षांनी एकदाच खेळल्यानंतर फेकून देण्याच्या लायकीची प्यादी म्हणूनच आपला उपयोग झाला आहे, हे आपल्याला समजत असते. खेळ त्यांचा होतो. आपला जीव जातो. ते पाहायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा स्थितीत आपण काहीही करू शकत नाही. विंदा करंदीकरांची कविता आपण जगत असतो.