फेसबुक लाइव्हद्वारे प्रोग्रामिंगचे क्लास; रत्नागिरीतील अभय भावेंचा उपक्रम

करोना संसर्गाच्या संकटामुळे लॉकडाउन लागू झाले. त्यामुळे, अत्यावश्यक सेवेत नसलेल्या आणि वर्क फ्रॉम होम करू शकत नसलेल्या नागरिकांना हाताशी बराच

गर्दीच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी ‘सॅनिटायझर टनेल’ बसवणार

करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्यात रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय, विद्यापीठे, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेलची उभारणी केली जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेने पुढाकार घेऊन कमी खर्चात सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे. काही राज्यांत त्याचा वापर आधीच सुरू झाला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

लॉकडाउनमध्ये शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे; रत्नागिरीतील तरुण प्राध्यापकाचा उपक्रम

पुण्यात कार्यरत असलेल्या आणि मूळच्या रत्नागिरीच्या असलेल्या शौनक माईणकर या तरुण प्राध्यापकाने लॉकडाउनच्या काळात शेअर बाजाराचे मोफत ऑनलाइन धडे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. स्टॉक टॉक असे या कोर्सचे नाव. शेअर बाजारात अभ्यासपूर्ण गुंतवणूक करू इच्छिणारी कोणीही व्यक्ती या कोर्समध्ये सहभागी होऊ शकते.

रत्नागिरीत आढळला दुसरा करोनाबाधित रुग्ण; निर्बंध अधिक कडक

रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाचा एकमेव रुग्ण बरा होत असतानाच रत्नागिरीत आणखी एक करोनाबाधित रुग्ण आज (तीन एप्रिल २०२०) आढळला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. आणखी एक रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा प्रचंड वेगाने कामाला लागली आहे.

‘करोना’ची लक्षणे ओळखण्यासाठी सरकारचे ऑनलाइन स्वयंचाचणी टूल

करोना विषाणूचा संसर्ग झाल्याची प्राथमिक लक्षणे नागरिकांना स्वतःच ओळखता यावीत, यासाठी महाराष्ट्र सरकारने सेल्फ असेसमेंट टूल (स्वयंचाचणी) विकसित केले आहे. हे टूल मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. वैद्यकीय सल्ला हवा असेल, तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहेत. तसेच, यावर चाचणी केलेल्यांच्या लक्षणांच्या स्वरूपाची माहिती प्रशासनापर्यंतही आपोआप पोहोचवली जाणार आहे.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर; रत्नागिरीत अडकलेल्या तामिळी तरुणांची रत्नागिरी पोलिसांकडून भोजनव्यवस्था

रत्नागिरी : रत्नागिरीच्या एमआयडीसीत अडकून पडलेल्या दोनशे तामिळी तरुणांची भोजनाची व्यवस्था रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, तर त्यांच्याकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना आलेल्या ट्विटर संदेशाची त्वरित दखल घेऊन मुंढे यांनी ही व्यवस्था केली.