गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायण; १२५ जणांचा सहभाग

रत्नागिरी : गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीतील गीता भवनात आज (२२ डिसेंबर) सकाळी चार तास संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण करण्यात आले. या पारायणात १२५हून अधिक महिला, पुरुष, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृत भारती या सहा संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नौदलाच्या गणवेशावर लवकरच शिवराजमुद्रेचे मानचिन्ह : नरेंद्र मोदी

मालवण : भारतीय नौदलाच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा समावेश केला जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (४ डिसेंबर २०२३) येथे सांगितले.

साने गुरुजी कथामालेतर्फे आचरा येथे कथाकथन महोत्सव

मालवण : बँक ऑफ महाराष्ट्रची आचरे शाखा आणि साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेच्या संयुक्त विद्यमाने आचरे येथे मालवण तालुकास्तर कथाकथन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आमच्या नमशीचे भाऊमामा

आचरा (मालवण) येथील ज्येष्ठ लेखक आणि ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे मामा सदानंद काशिनाथ सामंत (नमस) यांना नुकतीच देवाज्ञा झाली. त्यांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला, आजोळच्या समृद्ध आठवणी जागवणारा हा लेख…

मळगावमध्ये दीड दिवसासाठी नागोबाची प्रतिष्ठापना

सावंतवाडी : मळगाव (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथील गोसावी घराण्यात गेल्या दोनशे वर्षांहून अधिक काळच्या परंपरेनुसार दीड दिवसासाठी पाच फडांच्या नागाचे पूजन करण्यात आले.

उक्षीचे मिलिंद खानविलकर विशेष कार्यकारी अधिकारी

रत्नागिरी : उक्षी गावचे सुपुत्र मिलिंद खानविलकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.