शिक्षणतज्ज्ञ जी. टी. गावकर शिक्षण सेवामयी पुरस्कार रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहीर

अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे दिला जाणारा थोर शिक्षणतज्ज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षण पुरस्कार यंदा रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या कार्यरत आहेत.

कवी केशवसुतांच्या सकारात्मक विचारांचे जयंतीनिमित्ताने स्मरण

मालगुंड : मराठी साहित्यातील समाजपरिवर्तक साहित्यिक कवी केशवसुत यांच्या शतकोत्तर पंचावन्नाव्या जयंतीनिमित्ताने मालगुंड येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या सकारात्मक विचारांचे स्मरण करण्यात आले.

टेंभ्ये शिक्षण संस्थेचे सचिव राजाभाऊ साळवी यांची १६ ऑक्टोबरला शोकसभा

रत्नागिरी : टेंभ्ये पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव टेंभ्ये ग्रामस्थ हितवर्धक संघाच्या टेंभ्ये शाखेचे अध्यक्ष आणि क्षत्रिय मराठा मंडळाचे सरचिटणीस राजाभाऊ साळवी यांची शोकसभा येत्या १६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

बॅ. नाथ पै जन्मशताब्दी : खासदार राऊतांकडून सिंधुदुर्गातील १३० वाचनालयांना ‘सिंधुसाहित्यसरिता’ची भेट

बॅ. नाथ पै यांची जन्मशताब्दी नुकतीच २५ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, सिंधुसाहित्यसरिता हे पुस्तक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १३० वाचनालयांना भेट पाठवण्याचा निर्णय खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे.

साप्ताहिक ‘कोकण मीडिया’ दिवाळी अंकाची कथा स्पर्धा

रत्नागिरी : साप्ताहिक ‘कोकण मीडिया’ तर्फे यावर्षीच्या दीपोत्सवानिमित्ताने अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धा आयोजित केली आहे. इम्युनिटी हा या कथा स्पर्धेचा विषय आहे.

भास्करराव शेट्ये यांची रविवारी मालगुंडला शोकसभा

रत्नागिरीचे सुपुत्र, महाराष्ट्र विधानसभेचे माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र-गोवा बॅंकिंग लोकपाल, कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त भास्करराव शेट्ये यांची रविवारी मालगुंडला शोकसभा होणार आहे.