ठाण्यात ११, १२ जानेवारीला कोमसापचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन

ठाणे : गेली सुमारे तीन दशके साहित्य व्यवहारात आपल्या साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमांनी आगळा ठसा उमटविलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्ती समितीद्वारे दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ११ आणि १२ जानेवारीला ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हे संमेलन पार पडणार आहे.

ग्रामीण भागातील साहित्यनिर्मितीला कोमसापचा आधार – डॉ. मुणगेकर

रत्नागिरी : ग्रामीण भागात उत्तम साहित्यनिर्मिती होत असून त्याकरिता कोकण मराठी साहित्य परिषद हा मोठा आधार आहे. महाराष्ट्रातील इतर कोणत्याही साहित्य परिषदांपेक्षा हे वेगळेपण आहे, असे मत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी नमिता कीर

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षपदी विद्यमान कार्याध्यक्ष सौ. नमिता कीर यांची, तर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी खासदार, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची निवड करण्यात आली आहे.

साने गुरुजी कथामालेचा नाथ पै युवाशक्ती पुरस्कार यशराज प्रेरणा युवा संघटनेला जाहीर

मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण तालुका शाखेचा बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार मालवण तालुक्यातील आचरे येथील यशराज प्रेरणा या युवा संघटनेला जाहीर झाला आहे.

कोकण मीडियाच्या अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाने दीपोत्सव विशेषांकाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अशोक प्रभू स्मृति कथा स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. पुण्यातील अस्मिता महाजन यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे. सविस्तर निकाल वाचा…

साप्ताहिक कोकण मीडिया – इम्युनिटी विशेष दिवाळी अंकाचे अंतरंग

साप्ताहिक कोकण मीडियाने यंदाचा (२०२१) दिवाळी अंक इम्युनिटी या विषयावर काढला आहे. त्या अंकाचे अंतरंग येथे उलगडून दाखवले आहेत. इम्युनिटी या विषयावरचे विविध तज्ज्ञांचे लेख, वैचारिक लेख, इम्युनिटी विशेष व्हिडिओ मालिका, तसंच इम्युनिटी या विषयावर घेतलेल्या कथा स्पर्धेतल्या विजेत्या कथा, अन्य कथा, कविता, व्यंगचित्रं अशी वैविध्यपूर्ण साहित्यिक मेजवानी या अंकात आहे. त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे.