भास्करराव शेट्ये यांची रविवारी मालगुंडला शोकसभा

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र, महाराष्ट्र विधानसभेचे माजी प्रधान सचिव, महाराष्ट्र-गोवा बॅंकिंग लोकपाल, कोकण मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त निवृत्त न्यायाधीश भास्करराव शेट्ये यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत्या रविवारी (दि. ५ सप्टेंबर) मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात दुपारी तीन वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि सभासद यांच्यासह हितचिंतकांनी शोकसभेला उपस्थित राहावे, असे आवाहन कोमसापच्या कार्याध्यक्षा सौ. नमिता कीर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply